Home क्राईम खासदार ओमराजे यांना टिप्परने उडवण्याचा प्रयत्न!

खासदार ओमराजे यांना टिप्परने उडवण्याचा प्रयत्न!

165

१० जून वार्ता: धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आज सकाळी व्यायाम करायला बाहेर गेले होते. यावेळी एका टिप्पर चालकाने टिप्पर भरधाव वेगाने चालवीत खासदार ओमराजे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले. त्यानंतर त्या टिप्परचा पाठलाग करीत एका व्यक्तीला पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे.