Home राजकारण निलेश राणे दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा! शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर राष्ट्रवादीचे...

निलेश राणे दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा! शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक….

285

८ जून वार्ता: माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांची थेट औरंगजेबाशी तुलना केली होती. यावरुन आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता. निलेश राणे दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी म्हटलं आहे.

बाबा गुजर यांनी काय म्हटलं?

निलेश राणे (Nilesh Rane) दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा. निलेश राणे यांच्या कानाखाली लगावणाऱ्याला बक्षीस देखील असल्याचंही गुजर यांनी जाहीर केलं आहे. जो निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवेल त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस गुजरांनी जाहीर केलं आहे.

निलेश राणेंनी वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे.

निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे. निलेश राणेच्या वादग्रस्त ट्वीटबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपने माफी मागावी. येत्या २४ तासात कारवाई केली नाही तर उद्या पोलिस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन करणार, असल्याचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.