Home स्टोरी कलंबिस्त येथील अशोक राऊळ यांच्या बांबू काजू साग बागायत जळून खाक.

कलंबिस्त येथील अशोक राऊळ यांच्या बांबू काजू साग बागायत जळून खाक.

313

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ओझरवाडी मड भागातील आठ एकर जागेतील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी अशोक वासुदेव राऊळ यांच्या बांबू साग काजू ची कलमे झाडे यांना आग लागून जळून खाक झाले आहेत या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जवळपास ७०० ते ८०० झाडे जळून खाक झाली याबाबत कृषी विभागाला कळवण्यात आले आहे. बागांना आग लागण्याचे प्रकार सर्रास सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत आहेत. वनवे लावण्याचा प्रकाराने जंगल नष्ट होत आहेत. वना खात्याने याबाबत उपाययोजना व चळवळ उभारले पण शेतकऱ्यांची काजू साग बांबू बागायती ना अज्ञात कुणी आग लावत आहेत त्याचा शोध घ्यावा अशी मागणी श्री राऊळ यांनी केली आहे.