Home स्टोरी कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने अवघ्या ३ तासात १२२ कसूरदारांना ठोठावला २ लाख ७...

कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने अवघ्या ३ तासात १२२ कसूरदारांना ठोठावला २ लाख ७ हजारांचा दंड!

152

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेत वाहतूकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांवर कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने विविध कारणांसाठी अवघ्या ३ तासात दंड ठोठावून दोन लाख ७ हजारांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक विभागाची हि विक्रमी वसूली असल्याचे बोलले जात आहे. कल्याण वाहतूक विभागाचे सह पोलिस आयुक्त यांचे आदेशान्वये मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ या ३ तासात कोळसेवाडी वाहनतूक विभाग कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता या विशेष तपास मोहीमेत रिक्षांचालकांसाठी विना गणवेश, विना परवाना, थांबा सोडून प्रवासी भरणे तर खाजगी वाहनांसाठी काचेवरील प्रतिबंधीत असलेली काळी फिल्म लावणे, सिट बेल्ट शिवाय वाहन चालवणे, वाहनाचे वैद्य प्रमाण पत्र नसणे, वैद्यते बाबतचे नुतनिकरण नसणे अशा प्रकारच्या एकूण ८ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १२२ कसूरदार वाहन चालकांवर धडक कारवाई करून २ लाख ७ हजार १०० रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठवला आहे. या धडक कारवाईत कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी, अंमलदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रशांत देवणे व सहा मो. निरिक्षक श्री दिनेश ठोकणे यांचे सहकार्याने ही मोहीम फत्ते पाडण्यात आली.