Home स्टोरी आयोगाने तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना चौकशीला बोलवावे! – देवेंद्र फडणवीस

आयोगाने तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना चौकशीला बोलवावे! – देवेंद्र फडणवीस

72

७ जून वार्ता: कोरेगाव भीमा प्रकरणी मला चौकशीला बोलावण्‍यापूर्वीही अर्ज केले होते. त्‍यावर आयोगाला जो निर्णय घ्‍यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. प्रकाश आंबेडकर हे निष्‍णात अधिवक्‍ता आहेत. आयोगासमोर कुणाला बोलवावे आणि कुणास बोलवू नये; परंतु राजकारणाची दिशा भरटकवण्‍यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्‍याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात, अशी प्रतिक्रिया सध्‍याचे उपमुख्‍यमंत्री आणि तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्‍यास सांगितले. त्‍यावर त्‍यांनी वरील प्रतिक्रिया दिली. कोरेगाव भीमा विजयस्‍तंभ येथे वर्ष २०१८ मध्‍ये दंगल झाली होती. सध्‍या या प्रकरणी आयोगासमोर चौकशी चालू आहे. आता आंबेडकर यांना आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.