Home स्टोरी परदेश गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परदेश गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

122

६ जून वार्ता: आज महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्ट (PSP)च्या संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खाजगी क्षेत्रातील टॉरेंट पावर या दोन कंपन्यांशी केले आहेत. तसेच यातून जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणुक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलं, तसेच जगभरात रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात पंप स्टोरेज ही अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे. ज्यामध्ये खालच्या जलाशयातून दिवसा सोलरच्या माध्यमातून पाणी उचललं जातं आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं आणि रात्री वरच्या झलाशयातून ते पाणी खाली आणून टर्बाइनच्या माध्यमातून विजनिर्मीती केली जाते. यामुळे २४ तास आपल्याला पारंपारिक उर्जा कमी किंमतीत मिळते असे फडणवीस म्हणाले. ग्रीड स्टॅबिलाइज करण्यासाठी ही वीज एका मिनीटात सुरू करता येते आणि आवश्यकता नसल्यास ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राने आज केलेले करार ऐतिहासिक आहेत. इतकी गुंतवणुक कुठेही आली नाहीये.

महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुक येत आहे. कालच एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. २०२०-२१ मध्ये गुजरात एक नंबरवर होता, २०२१-२२ मध्ये कर्नाटक एक नंबरवर होतं. आता आमचं सरकार आलं आहे ,आता महाराष्ट्राला नंबर एक वर नेऊ. आता डीआयपीपीने आकडे घोषित केल्यानंतर एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकवर महाराष्ट्रच आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे-तिकेडे गेले असं म्हणत होते आता तरी त्यांची तोंड बंद केली पाहिजेत असेही फडणवीसांनी सांगितलं.