Home स्टोरी शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची ‘एसीबी’कडे चौकशीची मागणी.

शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची ‘एसीबी’कडे चौकशीची मागणी.

103

६ जून वार्ता: शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरु असून राज्यभरातील ३६ शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी एसीबी’लाही पाठल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक, शिक्षण अधिकार्‍यांच्या चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात शिक्षण विभागात गैरव्यवहार सुरु असल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांना ५० हजाराची लाच घेताना अटक केली. काही महिन्यांपुर्वी सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्याही गैरव्यवहार समोर आले होते.

शिक्षण अधिकारी, उपसंचालक लाखो रुपयांची लाच घेतात.पकडलेही जातात, पण पुढे काय होते. अशा अधिकाऱ्यांची खुली चौकशी व्हावी, यासाठी जनतेनेच पुढे येऊन हे सांगायला हवं. या लोकांनी कशी लाच घेतली आणि कुठे कुठे संपत्ती जमा केली आहे. अशी प्रतिक्रिया सूरज मांढरे यांनी दिली आहे.