Home क्राईम कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली स्फोटके!

कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली स्फोटके!

127

कर्नाटक: राज्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. यात ६ सहस्र डिटोनेटर्स आणि २ सहस्र ८०० जिलेटिनच्या कांड्या यांचा समावेश आहे. वाहन तपासणी करतांना पोलिसांना महंमद मुस्तफा याच्या वाहनात ही स्फोटके सापडली. त्याला कह्यात घेऊन त्याच्या घरी धाड घातली असता तिथे आणखी स्फोटके सापडली. पोलिसांनी मुस्ताफाला अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मुस्ताफाला त्याच्या घरी नेल्यावर तो न्हाणीघरात गेला आणि तिथून बाहेर आलाच नाही. पोलिसांनी दार तोडल्यावर त्याने त्याचा हात कापण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तत्परतेने त्याला जिल्हा चिकित्सालयात भरती केले. मुस्तफाच्या चौकशीत तो कर्नाटकमधील खाण मालकाला पुरवण्यासाठी ही स्फोटके संग्रहित करत असल्याचे त्याने सांगितले.