Home स्टोरी ४ जून रोजी कोल्हापूरला शेतकऱ्यांचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

४ जून रोजी कोल्हापूरला शेतकऱ्यांचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

246

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन चार जूनला कोल्हापूर येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील नामवंत कवी विठ्ठल वाघ व उद्घाटन नामवंत कवी वात्रटीकाकार रामदास फुटाणे करणार आहे. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राजू शेट्टी असून या संमेलनात डॉ.आ.ह. साळुंखे, प्रवीण तरडे, निखिल वागळे, वामनराव चटप, सुरेश शिंदे, दि बा पाटील, विजय चोरमारे, इंद्रजीत देशमुख, वसंत भोसले, जालंदर पाटील, भरत दौंडकर, विष्णू थोरे, अरुण पवार या सारखे नमवंत साहित्यिक, कवी, पत्रकार, विचारवंत सहभागी होणार आहेत. शेतकरी प्रश्नांवर सखोल विचारमंथन व मान्यवरांच्या विचारांची मेजवानी घेण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

विनीत संदीप जगताप निमंत्रक पहिले नांगरट साहित्य संमेलनसंपर्क _7218625960