Home स्टोरी CSDS च्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम!

CSDS च्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम!

87

२४ मे वार्ता: लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) नं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत NDTV साठी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर १० ते १९ मे दरम्यान १९ राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम आहे.

या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४३ टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २७ टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४-४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव ३ टक्के, नितीश कुमार १ टक्का आणि १८ टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. २०१९ आणि २०२३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्यालोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ४३ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर ३८ लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे ४० टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, २८ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.