Home स्टोरी ३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल! अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा

३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल! अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा

75

२३ मे वार्ता: अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचं काम प्रगतीपथावर असून याच वर्षी ते भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. कुठल्या तारखेपासून भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, मंदिर ट्रस्टनं निर्णय घेतला आहे की, राम मंदिर निर्मितीचा पहिला टप्पा २० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. पण आम्ही प्रयत्न करतोय की, ३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल.

पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरचा जे पाच मंडप आहेत, यातील सर्व प्रमुख तर गर्भगृह आहे, जिथं भगवान श्रीरामाची मुर्तीची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर गुरु मंडप आहे, प्रार्थना मंडप आहे, नृत्य मंडप आहे. या पाचही मंडपांमध्ये १६० स्तंभ आहेत. त्यामध्ये नक्षीकाम आहे. तसेच लोअर प्लिन्थमध्ये श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग दाखवले जाणार आहेत. तसेच वीजेची आणि इतर व्यवस्था यामध्ये असतील.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पहिला मजला आणि दुसरा मजला यासाठी तसेच परिक्रमेचं स्थान आहे. यासाठी ३० डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु होणं अपेक्षित आहे.