Home स्टोरी भगवान गौतम बुद्ध व बाबा साहेबांचे विचार मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे!

भगवान गौतम बुद्ध व बाबा साहेबांचे विचार मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे!

173

अनिल तांबे यांचे प्रतिपादनजानवली बौद्ध विकास संघाच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव….

मसुरे प्रतिनिधी: जानवली बौद्ध विकास संघाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले,विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई या आदर्शांचा संयुक्त जयंती महोत्सव जानवली येथे नुकताच संपन्न झाला.

सकाळच्या सत्रात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन,पंचशील ध्वजवंदन, धम्म पूजापाठ ,विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न झाला. श्रीम.लाड (ग्रामसेविका-जानवली) प्राथमिक शिक्षिका सौ. मानसी मेस्त्री यांनी आपले उद्बोधक विचार मांडले. शिक्षण हे मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे साधन आहे.विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य शिक्षणाद्वारे उज्वल करावे.असे प्रतिपादन सौ लाड यांनी केले तर मानसी मेस्त्री यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक प्रसंग सर्वांसमोर उत्कृष्टरित्या मांडून सर्वांची मने जिंकली.

रात्रौच्या अभिवादन सभेत अनिलजी तांबे म्हणाले की, कणकवली-जानवली ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.१४मे१९३८रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी येथे परिषद घेतली होती. या पावन भूमीत सिंपन प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही पाऊल ठेवत आहोत. यासाठी समस्त जानवली गावातील धम्म बंधू भगिनींनी सहकार्य करावे. जानवली बौद्ध विकास संघाचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून या ठिकाणी बाबासाहेबांचे व तथागतांचे आदर्शव्रत विचार या संघटनेच्या माध्यमातून राबवले जात आहेत. याचा मला निश्चितच अभिमान व आनंद वाटतोय! असे गौरवोद्गार काढले.

या सभेला डॉ.व्ही.जी.कदम, रविंद्र तांबे,किशोर कदम,सविता जाधव, विद्याधर तांबे, दिपक कदम(वाडोस), नूतन कांबळे, संतोष तांबे, जानवली बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष दीपक कदम, माता रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा अश्विनी कदम,पूजा कदम, प्रियांका कदम, अशोक कदम, संतोष कदम,प्रकाश कदम, महेश कदम,अस्मिता कदम,संदेश कदम,कार्तिकी कदम, मिलिंद पवार,चैतन्य पवार,साधना पवार,प्रतिक पवार,सौरभ कदम यांची उपस्थिती होती . अभिवादन सभेच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामधील योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.बाबासाहेबांच्या व शिवरायांच्या जीवनावरील प्रसंग नृत्यातून सादर केलेले अभिवादन या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.