Home स्टोरी चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू!

चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू!

93

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी दया नायक यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत घेण्यात आले आहे. चकमक तज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’) म्हणून ओळख असणारे नायक यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलीस येथे त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘तुम्हा सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करीन आणि माझ्या पूर्ण क्षमतेने मुंबईची सेवा करीन’, असे त्यांनी म्हटले आहे.वर्ष १९९९ ते २००३ या कालावधीत नायक यांनी मुंबईत गुन्हेगारीविश्वाची दहशत असतांना त्यांनी ८० हून अधिक गुंडांना चकमकीत ठार केले होते.