सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शिनिवार दि.२०/५/२०२३ रोजी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिलांसाठी ज्वेलरी व राखी तयार करण्याचे मोफत शिबिर श्री.संतोष मयेकर यांनी स्नेहवर्धक मंडळ देवगड येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात देवगड तालुक्यातील विविध गावांतील महीलांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमावेळी मान. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जामसंडे कट्टा गावातील भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वरा करंगुटकर,सौ.अनिषा माजगांवकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा व प्रवक्त्या), श्रीम.वैष्णवी सरफरे (माजी नगरसेविका), सौ.प्रांजल राणे (महिला उपविभाग अध्यक्षा तसेच श्री.संतोष मयेकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
Home राजकारण जामसंडे कट्टा गावातील भाजपाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वरा करंगुटकर यांचा मनसेत...