Home राजकारण सावंतवाडी कोर्टच्या प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ करा…. सामाजिक बांधिकीची मागणी

सावंतवाडी कोर्टच्या प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ करा…. सामाजिक बांधिकीची मागणी

76

सावंतवाडी वार्ताहर: सावंतवाडी कोर्टच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या झाडावर रात्रीच्यावेळी शेकडो पक्षी निवासस्थानाला असतात. त्यामुळे त्या परिसरात त्यांचे विस्ट (सिट) पडून तेथील परिसर पांढराशुभ्र झालेला आहे.तसेच तो परिसर त्यांच्या विस्टामुळे पूर्ण पणे दुर्गंध युक्त झालेला आहे. त्याचा त्रास फुटपाथ वरून चालणाऱ्या व कोर्टात ये जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. सदर परिसर आठवड्यातून एकदा तरी पाण्याच्या बंबाने स्वच्छ करावा. अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.