Home स्टोरी श्री समर्थ अवधुत महाराज समाधी मंदिर कलशारोहण वर्धापनदिन २० मे...

श्री समर्थ अवधुत महाराज समाधी मंदिर कलशारोहण वर्धापनदिन २० मे रोजी!

84

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथे २० मे २०२३ रोजी श्री समर्थ अवधुत महाराज यांच्या समाधी मंदिर कलशारोहण प्रथम वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विवीध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सकाळी ७ वा. श्रींच्या समाधीची विधीवत पूजा अर्चा, सकाळीं ९ ते ११ वा. धार्मिक विधी,दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. स्थानिकांनी सुश्राव्य भजने, रात्रौ ९ वाजता खानोलकर दशावतार नाट्य कंपनीचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.  या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.