Home स्टोरी श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडीचे युवा सदस्य दशरथ माळकर यांचे...

श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडीचे युवा सदस्य दशरथ माळकर यांचे दुःखद निधन

159

सावंतवाडी वार्ताहर: श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मळेवाड येथे श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडी या मंडळाने विविध मैदानी स्पर्धानच आयोजन केल होत. यामध्ये शैक्षणिक शालेय स्तरावर भाला फेक स्पर्धा, गोळा फेक स्पर्धा, थाळी फेक स्पर्धा तसेच खुल्या गटामध्ये रस्सीखेच स्पर्धा आणि गाव मर्यादित महिलांची रस्सी खेच स्पर्धा या खेळांचा समावेश होता. याच मंडळाचा एक उमदा आणि युवा सदस्य मयूर दशरथ माळकर, वय वर्ष ३६ यांचं अचानक हृदय विकाराने शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दुःखत निधन झालं आणि गावात एक शोककळा पसरली. मंडळाच्या शिवाजयंती नियोजित कार्यक्रम आणि मैदानी स्पर्धा यामध्ये मयूर माळकर याचा मोठा सहभाग होता. मंडळातील या दुःखत प्रसंगी कार्यक्रमांच आयोजन कारण ही मानसिक वेदनादाई बाब लक्षात घेऊन मंडळाची कार्यकारणी, वरिष्ठ सभासद आणि मयूर याची मित्र मंडळी यांनी नियोजित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या मिटिंग मध्ये घेतला आहे.