सिंधुदुर्ग प्रतिनिधी: युद्ध, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे वर्ष २०२२ मध्ये ७ कोटी १० लाख लोक जगभरात विस्थापित झाल्याची माहिती ‘अंतर्गत विस्थापन निरीक्षण केंद्रा’च्या जागतिक अहवालात देण्यात आली आहे. यात भारतात नैसर्गिक आपत्तीमुळे २५ लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती देण्यात आली आहे.युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे.पुरामुळे पाकिस्तान, नायजेरिया आणि ब्राझिल या देशांमध्ये सर्वाधिक विस्थापन झाले. सोमालिया, केनिया आणि इथियोपिया येथे दुष्काळामुळे विस्थापन झाले. वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये विस्थापितांच्या संख्येत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.