Home स्टोरी १५ मे रोजी तिरवडे येथे रक्तदान शिबिर….

१५ मे रोजी तिरवडे येथे रक्तदान शिबिर….

118

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकि जपणार तिरवडे येथील श्री देवी माऊली मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त तिरवडे गावात कै. दिनेश गावडे मित्र मंडळ आयोजित गाव मर्यादित १३ व १४ मे क्रिकेट सामने व १४ मे सकाळी नेत्र तपासणी, १५ मे २०२३ भव्य रक्तदान शिबिर सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वा.पर्यंत हे शिबिर श्री.माऊली मंदिर तिरवडे येथे होणार आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी ही सर्व तिरवडे ग्रामस्थानी आणि इतर सर्वांनी या जीवनदायी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपली माणुसकीची जबाबदारी पार पाडावी.तसेच १५ मे रात्री १० वाजता तिरवडे ग्रामविकास मंडळ मुंबई (रजि.) कलाविभाग आयोजित सामाजिक नाटक देव नाही देव्हाऱ्यात होणार आहे.

अधिक माहिती साठी श्री.गणेश गावडे 8898679359 यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन केलं आहे .