Home स्टोरी दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशाचा आतंकवादी हल्ल्यापासून बचाव……

दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशाचा आतंकवादी हल्ल्यापासून बचाव……

47

दिल्ली: दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १० मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचं देखील म्हटलं जात आहे. यासोबतच त्यांनी पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. माहितीनुसार, पंजाबमधील बंजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते.

अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते.