Home क्राईम १२ वर्षीय मुलीचा पिच्छा करत लाजस्पद कृत्य करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल…..

१२ वर्षीय मुलीचा पिच्छा करत लाजस्पद कृत्य करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल…..

121

सोलापूर: मैत्रिणीकडे अभ्यासाला जाताना १२ वर्षीय मुलीचा पिच्छा करत तू मला आवडते असे म्हणत, तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शहारुख शेख (रा.सोलापूर) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी ही १२ वर्षाची असून तिने नुकतेच सहावीची परीक्षा दिली आहे. ती अभ्यासासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना तिला ८ मे रोजी दुपारी आरोपी शहारुख हा तिचा पाठलाग करू लागला. शिवाय तिला रस्त्यात आडवून मला तुला बोलायचे आहे,असे म्हणाला. शिवाय आरोपी हा पीडितेचा पाठलाग करत होता. हि घटना पीडितेने घरी आल्यानंतर आईला सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.