Home राजकारण आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल! खासदार संजय राऊत….

आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल! खासदार संजय राऊत….

113

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या गुरुवार दि.११ मे रोजी जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी माहिती दिली आहे. यावरून “या देशात लोकशाही आहे की नाही?, हा देश विधानसभा आणि संसद संविधानानुसार चालल्या आहेत की नाही? काम करताहेत की नाही? सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कोणाच्या दबावाखाली काम करतंय? याचाही फैसला उद्या लागेल”, असं संजय राऊत म्हणाले. असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल. पाकिस्तानात तुम्हाला आज संविधान जळताना दिसतंय कारण पाकिस्तानसारखं राष्ट्र आपलं दुश्मन राष्ट्र असलं तरीही ते जळतंय. कारण ते संविधानानुसार चाललं नाही. विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाया होत आहेत. सरकार पाडली जातायत, सरकारं आणली जातायत. न्यायव्यवस्था विकली गेली, हे चित्र या देशात असू नये. यासाठी उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीरांनी, स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानसुद्धा आहे. त्यांच्या रक्षणासंदर्भातील निर्णय उद्या येईल, त्यामुळे आम्ही आशावादी आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.