Home स्टोरी राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले! २ महिलांचा मृत्यू….

राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले! २ महिलांचा मृत्यू….

146

जोधपूर: भारतीय वायूदलाचे ‘मिग २१’ हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळून झालेल्या अपघातात घरातील २ महिलांचा मृत्यू, तर १ जण घायाळ झाला. हनुमानगड गावातील बहलोलनगर येथे ही दुर्घटना घडली. वैमानिक आणि सहवैमानिक यांनी वेळीच विमानातून उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले. ‘या अपघाताची चौकशी केली जाईल’, असे भारतीय वायूदलाने म्हटले आहे.