Home स्टोरी वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

67

सावंतवाडी प्रतिनिधी: ७ मे रोजी दुपारी वाफोली गावातील बबन आना गवस आणि बाबली आना गवस यांच्या तिलारी कॅनल लगत असलेल्या काजू बागेमध्ये आग लागली. यामध्ये अंदाजे चार एकर जमिनीवरील काजूची झाडे आणि बांबूची बेटे जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १०० मोठी काजूची झाडे आणि १०० बांबूची बेटे पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असून सदरची आग कोणी लावली याबाबत नक्की कल्पना आली नाही ही आग कॅनल वरून चालू होऊन खाली बागेत गेली.

जळून खाक झालेलू बांबूची बेटे
जळून खाक झालेली काजुची झाडे

सदरच्या जागेवर कालव्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून मागील सहा महिन्यापासून ठेकेदारांनी तेथे तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारल्या आहेत आणि आपले सामान ठेवले आहे आणि त्यांची माणसे तेथे कायमस्वरूपी वस्तीला आहेत. पण ठेकेदाराच्या कुठल्याही सामानाचं नुकसान झालं नाही.