Home राजकारण मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यानंतर आता राऊत नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यानंतर आता राऊत नाशिक दौऱ्यावर

108

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरून माघारी फिरताच आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सध्या अनेक राजकीय पक्षांच्या बैठका नाशिकमध्ये होत आहेत.त्यामुळे नाशिकची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकारिणीची बैठक सुद्धा नाशिकमध्येच पार पडली होती. यावेळी भाजपचे अनेक बडे नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाशिकमध्ये होते. काल सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनमाड दौऱ्यावर होते. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहेत.संजय राऊत हे महिनाभरानंतर पुन्हा नाशिकला येत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाकडून काय हालचाली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ज्या-ज्या वेळी संजय राऊत नाशिकला आले आहेत, त्या-त्या वेळी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं संजय राऊत यांचे नाशिकमध्ये येणं शिवसेना ठाकरे गटाला थोडं महागातच पडलं आहे असं म्हणावं लागेल. खासदार संजय राऊत आज नेमकं काय बोलणार? याबाबत चर्चा होत आहे.राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत, त्याचा केंद्रबिंदू नाशिक होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. तर त्याचवेळी भाजपाने राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मनमाडला भेट दिली. आता ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज नाशिकामध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे आतापर्यंत राऊत आले आणि राजकीय वाद वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. आता त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे गटाने राऊत यांना डिवचण्यासाठी पुन्हा काही पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केल्याची चर्चा होत आहे.