Home स्टोरी छत्तीसगड पोलीसाचा आंबोली दरीत कोसळून मृत्यू

छत्तीसगड पोलीसाचा आंबोली दरीत कोसळून मृत्यू

74

सावंतवाडी प्रतिनिधी: – गोवा येथून कर्नाटक येथे परतत असताना वाटेत आंबोली घाटात थांबलेल्या छत्तीसगड पोलीस जवानाचा पाय घसरून दरीत पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला हि घटना दि. ६ मे दिवशी घडली. आंबोली पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड रिझर्व पोलीस हे कर्नाटक रायबाग या ठिकाणी बंदोबस्तासाठी आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे ते एकूण पाच जण सर्व छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले पोलीस गोव्याला पर्यटनासाठी म्हणून शनिवारी सकाळी गेले होते. आंबोली घाटातील धबधबा जवळील एका वळणावरती थांबले. त्यातील तिघेजण खाली उतरले. त्यातील मीतेलेस पॅकेरा (वय ३५) हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास ३०० फूट खोल खाली कोसळला.