Home स्टोरी सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी...

सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी कोरड घशाला पडत आहे.

83

सावंतवाडी प्रतिनिधी: – शहराला २४ तास पाणी देणार या संकल्पनेतून राजकीय लोकप्रतिनिधीनी शहर वासियांना गेले वीस वर्षे आश्वासीक केले. यासाठी पाळणेकोंड धरणाची उंची वाढवून गोडबोले गेट बसविण्यात आले. पाणी साठा वाढला असे घोषित केले व उद्घाटन करण्यात आले. पण २४ तास पाणी काही नागरिकांना मिळाले नाही. दुसऱ्या एका लोकप्रतिनिधींनी केसरी येथील बंधाऱ्याचे मजबूतीकरण करत २४ तास पाणी मिळेल, असे आश्वासिक करून केसरी येथील बंधाऱ्याचे मजबूतीकरण व गाळ काढला. याचेही उद्घाटन करण्यात आले. पाणी साठा वाढल्याचे घोषित झाले. परंतु नागरिकांचे २४ तास पाणी हे स्वप्न अधुरे राहिले. अखेर नरेंद्र डोंगरावरील झऱ्यावर योजना आखण्यात आली. ती राबविण्यातही आली. योजना राबवूनहि २४ सेकंद पाणी वाढले नाही.प्रयेक वाड्यांसाठी शहरात २४ तास पाणी देणार यासाठी ती पाणी योजना राबविण्यात आल्या तश्याच पाणी साठविण्यासाठी प्रयेक वाडीवर उदा. लाखे वसाहत, शिल्पग्राम १ टाकी, रघुनाथ मार्केट – १ टाकी, समाजमंदिर १ टाकी, नरेंद्र डोंगर येथील दोन टाक्या, बांधण्यात आल्या. यापैकी काही टाक्यांमध्ये २४ तास सोडाच एक थेंबही पाणी टाक्यामध्ये साठविण्यात आले नाही. याकारणाने टाक्या जरी उश्याला असल्या तरीही सावंतवाडी वासीयांच्या कोरड घश्याला पडत आहे.

अपयशाला जबाबदार कोण? शहराला २४ तास पाणी देणार या संकल्पनेतून काही योजना व काही टाक्या बांधण्यात आल्या. त्या बांधण्यावर कर दात्यांचे काही कोटी खर्च झाले, परंतु काही कोटी खर्चूनही सावंतवाडी वासियांचे २४ तास पाणी हे स्वप्न अधुरे राहिले. नगरपरिषद प्रशासनाने परिसर अभियांत्रिकी शाखेतील तज्ञ, अनुभवी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली या योजनांची आखणी व बांधणी केली असती तर निराळाच निकाल मिळाला असता. परंतु प्रशासनाने अश्या नियुक्तीबाबत उदासिनता दर्शविले.अपयशाचे खापर झाडे शिंपणारे, मोटर लावणारे, पाण्याचा अपव्येय करणाऱ्यांच्या माथी मारले जात असून पाणी अपव्येय कोण करतो याची पाहणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. पाणी सोडणे व बंद करणारे कर्मचाऱ्यावर नगरपालिका प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.