Home स्टोरी कल्याण पूर्वेत निघाली बौध्द बांधवांचा ‘धम्म पहाट कँडल मार्च! ‘बुद्धं सरण्ं गच्छामी’...

कल्याण पूर्वेत निघाली बौध्द बांधवांचा ‘धम्म पहाट कँडल मार्च! ‘बुद्धं सरण्ं गच्छामी’ च्या स्वरांनी परिसर झाला मंगलमय!

223

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंती दिना निमित्त पहाटेच्या मंगलमय वातावरणात बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहभागाने कल्याण पूर्वेत ‘धम्म पहाट कँडल मार्च’ चे आयोजन करण्यात आले होते .

या कँडल मार्च मध्ये मान्यवर समाजबांधव तसेच असंख्य उपासक उपासिकांनी परिवारासह शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग घेवून तथागत गौतम बुद्धांना मानवंदना दिली. कल्याण पूर्वेतील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाच्या विद्यमाने प्रती वर्षी वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या पहाटे कँडल मार्च काढण्यात येवून तथागतांना वंदन करण्यात येत असते. जागृती मंडळाचा या कँडल मार्च मध्ये या वर्षी प्रथमच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तसेच पंचशिल धम्म भगिनी मंडळाच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता.

म्हसोबा चौकातील जागृती मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृहासमोरून पहाटे ६:३० वाजता या कँडल मार्चला प्रारंभ करण्यात आला. शुभ्र वस्त्र परिधान करून आणि हातात प्रज्वलीत मेणबत्ती घेवून असंख्य उपासक उपासिकांच्या सहभागाने हा कँडल मार्च पुढे तिसगांव नाका, पुणे लिंक मार्गे विजय नगर नाक्याहून छत्रपती शिवाजी कॉलनी मार्गे जुनी जनता सहकारी बँक, मुख्य बाजार पेठेतून पुढे जावून सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहारात पोहचल्या नंतर या ठिकाणी बुद्ध वंदना – त्रिसण – पंचशिलेचे पठण झाल्यानंतर खिरदानाने या कँडल मार्चची सांगता करण्यात आली.वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या भल्या पहाटेच्या मंगलमय वातावरणात हातात प्रज्वलीत मेणमत्ती घेवून आणि मुखाने ‘बुद्धं सरणं गच्छामी’ चा जयघोष करीत निघालेल्या या मंगलमय कँडल मार्च मध्ये जागृती मंडळ, पंचशील धम्म भगिनी मंडळ तसेच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती या संस्था संघटनांचे प्रतिनिधी आयु. -देवचंद अंबादे, परमेश्वर माटे, अशोक भोसले, पराग मेंढे, केतन रोकडे, प्रशांत कासारे, संजय राक्षसकर, मिलिंद सकपाळ, सुमेध हुमणे, शंकर पोळ, रणधीर फुलझेले, एस व्ही काणेकर, बाबा थुल, ओमप्रकाश धनविजय सर, एस आर भगत, दादाराव फुलझेले, कमलताई हिंगोले, माया गजभिये, ललिता आखाडे, पुष्पा टेकाळे, उषा भंडारे, अनुसया अहिरे, मीना सकपाळ, लता आव्हाड, रसिका टेभुर्णे, आशा तिरपुडे, अलका साळवे, सविता निकम, कमल धाबर्डे, मनीषा ठेवरे, सविता चालखुरे, लता शेंद्रे, लता त्रिभुवन आदि उपासक – उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.