Home राजकारण बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवणमध्ये पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, तर भाजपचे प्रकल्पाला समर्थन!

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवणमध्ये पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, तर भाजपचे प्रकल्पाला समर्थन!

58

मालवण प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवण बंदर जेटी येथे १ मे या दिवशी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आंदोलन केले. या वेळी त्यांनी हातात फलक घेऊन आणि प्रकल्पाच्या विरोधात घोषणा देत रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला. ‘या प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे’, असे सांगत बारसू येथे या प्रकल्पाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला. या वेळी मेगल डिसोजा, हार्दिक कदम, स्वाती पारकर, संजय वराडकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आलेले विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी २ मे या दिवशी कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली.

या वेळी दरेकर यांनी सांगितले, ‘‘बारसू रिफायनरीमुळे कोकणातील बेरोजगारी दूर होणार आहे. या प्रकल्पाला जर विरोध होत असेल, तर विरोधकांचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून केले जातील. भाजपची भूमिका नेहमी विकासासाठी सकारात्मक राहिली आहे. बारसू येथील प्रकल्पासाठी अनेक लोक सकारात्मक आहेत.’’