Home स्टोरी हरकुळ बुद्रुक येते रात्री गव्याचा वावर! कोटेश्वर शाळेच्या नजिक रात्री ११ च्या...

हरकुळ बुद्रुक येते रात्री गव्याचा वावर! कोटेश्वर शाळेच्या नजिक रात्री ११ च्या सुमारास गव्याचे दर्शन

168

कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरालगतच असलेल्या हरकुळ बुद्रुक गावच्या कोटेश्वर शाळेच्या नजिक भर रस्त्यात काल रात्री ११ च्या सुमारास गव्याचे दर्शन येथील नागरिकांना झाले. रहादारीचा रस्ता असून देखील या ठिकाणी गव्याचा वावर दिसल्यामुळे आता गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले काही महिने गव्याचा कळपाचा वावर हा शेजारील नागवे, करंजे, साकेडी परिसरात दिसून आला होता. त्यामुळे आता हरकुळ बुद्रुक गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.