Home राजकारण नितेश राणेंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

नितेश राणेंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

70

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांची भाजपने निवड केली. आज त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. महाविकास आघाडी संविधान नाही तर शरिया कायदा मानतो, असे नितेश राणे म्हणाले. लोकशाही नसती तर गरळ ओकता आली असती का? संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे जावई म्हणून फिरायचे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. यावेळी राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांचे भाषण ट्विट केले. याला उत्तर म्हणून नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवले. काँग्रेसमोर झुकणारे हिजडे आहेत, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. यावर नितेश राणे म्हणाले, आता काँग्रेसमोर कोण झुकतय, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. उद्धव ठाकरे यांना आता बाळासाहेबांच्या भाषेत ठाकरे सेनाप्रमुख म्हणायचं की हिजड्यांचा प्रमुख म्हणायचं, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

हुतात्मा चौकाचे शुद्धीकरण करण्याची मागणी देखील राणे यांनी केली. काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा चौकात गेले होते. उद्धव ठाकरेनितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटे पेंग्वीन असा उल्लेख केला. त्यांचे कुंटुंब , मोतोश्री कोण चालवत आहे? उद्धव ठाकरे बाहेर फिरतात, हे पैसे कुणाचे असतात? उद्धव ठाकरेंच्या खिशातून एक रूपया पण जात नाही. सर्व खर्च मुंबईचे उद्योजक आणि बिल्डर करतात. यावेळी त्यांना गुजरात्यांचा पैसा चालतो, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.