Home स्टोरी भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटेनी केली आत्महत्या?

भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटेनी केली आत्महत्या?

102

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बराटे यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बराटे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. संजय बराटे यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते. हवेली तालुक्याचे भाजपचे १९९५ दरम्यान सरचिटणीस होते.