Home राजकारण संजय राऊत यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवा! नितेश राणे

संजय राऊत यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवा! नितेश राणे

108

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भाजप नेते नितेश राणे यानी संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याचे अवाहन केले आहे. नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतांमुळे ठाकरे कुटुंबाची बदनामी होत आहे. आज सकाळी ऐकलं ते सत्यपाल मलिक यांना भेटायला जात आहेत. हा कोण सत्यवान मलिक आहे, ज्याच्याबद्दल पाकिस्तान गोडवे गातं आहे. पाकिस्तानने पत्रक जारी करत सत्यपाल मलिक खरं बोलत असतील तर हाच भारताचा खरा चेहरा आहे असं म्हटलं आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर भरताची बदनामी करण्याचं काम हे सत्यपाल मलिक करत आहेत आणि त्याला भेटायला संजय राऊत जात आहेत. संजय राऊत हे स्वतःला देशभक्त म्हणतात आणि जो माणूस पाकिस्तानसाठी देशाची प्रतिमा मलिन करतोय त्याला भेटायाल जात आहेत, तर सरकारला अवाहन करेन की संजय राऊत यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवा. हा देशद्रोही आहे, देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांना मदत करतोय. म्हणून देशद्रोही खटला संजय राऊत यांच्यावर चालवा अशी मागणी करून मी त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे. असे भाजपा नेते नितेश राणे म्हणाले आहेत.