मसुरे प्रतिनिधी:
सुरवंटाचे झाले फुलपाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू! नवे जग नवी आशा, शोध घेण्याची जबर मनीषा! याच शाळेने लावले वळण, त्यावर चढू यशाची चढण!
जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मालवण दांडी येथे इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला शा.व्य.समिती शिक्षणप्रेमी सदस्य श्री.दिनकर शेलटकर, शाळेच्या मुख्या.सौ.विशाखा चव्हाण, सातवीचे वर्गशिक्षक तथा राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकुर, श्री.रामदास तांबे, अंगणवाडी सेविका सौ.मोरजकर, सौ.परब, श्रीम.जेनी, सौ.बाणावलीकर, सौ.रेवंडकर,सौ.सारंग, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता ७ वी तसेच इयत्ता ६ वी मधील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी कु.विधिशा कुबल हिने आपल्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीचे श्रेय सर्वस्वी शाळेतील शिक्षकांना दिले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,तसेच शा.व्य. समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी कु. विधिशा कुबल, कु.निधी सारंग,कु.अमय रेवंडकर, कु.निहार धुरी, कु.नकुशा कारंडे, कु.सायमा शेख यांनी शाळेला भेटवस्तू म्हणून अब्राहम लिंकनचे पत्र याचा मोठा फोटो भेट दिला. वर्गशिक्षक श्री. शिवराज सावंत यांनी सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पँड भेट दिले.कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता ७ वी व ६ वी च्या वर्गाकडून सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.