Home राजकारण ठाकरे गटाचे रमाकांत देवळेकर यांचा शिंदे गटात प्रवेश!

ठाकरे गटाचे रमाकांत देवळेकर यांचा शिंदे गटात प्रवेश!

171

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवड): – शिवसेना पक्ष फुटीनंतरही काल पर्यंत ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेले संपर्क प्रमुख रमाकांत देवळेकर तसेच युवा सेनेचे संजय जयवंत मोरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जावून शिंदे गट अर्थात शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे .काल रकामांत देवळेकर यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर नव्या राजकीय वाटचालीला प्रारंभ करण्याच्या दृष्टीने रमाकांत देवळेकर यांनी वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते पक्ष प्रवेश करण्याचे सुनियोजीत केले होते. त्या साठी काल मुख्यमंत्री भेटीची रात्री ८ ची वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु देवळेकर यांना वर्षा बंगल्यावर पोहचण्यास एक तास उशीर झाल्याने मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देवळेकर सह, युवा सेनेचे संजय जयवंत मोरे तसेच भाजपा वाहतुक सेल चे जितेंद्र शिर्के यांना पक्ष प्रवेश दिला असल्याने माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी सांगितले.या समयी पुर्वी पक्ष प्रवेश केलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.