Home क्राईम कणकवली एसटी आगाराचे चालक रुपेश ठाकूर निलंबित.

कणकवली एसटी आगाराचे चालक रुपेश ठाकूर निलंबित.

218

कणकवली:- गाडी देण्यास उशीर होत असल्याने राज्य परिवहनच्या कणकवली आगाराचे वाहन परीक्षक यांना शिवीगाळ केली, तसेच वाहतूक निरीक्षक यांच्यासमोर अरेरावी करून धमकीची भाषा वापरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली आगाराचे चालक रुपेश ठाकूर यांना निलंबित करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी ही कारवाई केली.