Home स्टोरी कल्याण पूर्वेतील प्रस्तावित यु टाईप रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हरकती आणि सुचना सादर करण्यासाठी...

कल्याण पूर्वेतील प्रस्तावित यु टाईप रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हरकती आणि सुचना सादर करण्यासाठी नोटीस जाहिर प्रसिध्द!

57

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण पश्चिमे प्रमाणेच कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्पा यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८० फुट रुंदीकरणाचे कामास लवकरच प्रारंभ होणार असून या प्रस्तावित ८० फुट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालीकेने नागरीकांच्या हरकती आणि सुचना जाणून घेण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटीसी नुसार नागरीकांनी आपल्या हरकती अथवा सुचना १८ मे २ ० २३ पर्यंत महापालीकेच्या नगर रचना विभागात लेखी स्वरूपात सादर करावयाच्या आहेत.

काटेमानिवली नाका ते गणेश मंदीर ते माता रमाई नगर – म्हसोबा चौक ते तिसगांव नाका या यु टाईप रस्त्याचे रुंदीकरण गेली अनेक वर्ष रखडले होते. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण आता अटळ असून लवकर या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्या पूर्वी नागरीक आणि संबंधीतांनी आपल्या हरकती – सुचना १८ मे २०२३ पूर्वी महापालिकेच्या नगर रचना विभागात सादर करावयाच्या आहेत. या रस्ता रुंदीकरणात विकास आराखड्यातीत सेक्टर १ मधील आरक्षण क्रमांक २०३, २०४, २०५ तसेच सेक्टर ४ मधील आरक्षण क्र . ४७४, ४७७, ४७८, ४७९ ही नागरी सुविधांच्या प्रयोजनार्थ असलेले राखिव भूखंडही बाधीत होत आहेत, या आरक्षीत भूखंडाबाबतही फेरबदल करणे आवश्यक असल्याने या बाबतही नागरीकांच्या हरकती तसेच सुचना लेखी स्वरूपात द्यावयाच्या आहेत.

या प्रक्रीयेनंतर सद्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याने २४ मिटर अर्थात ८० फुट रुंदीकरण प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. या रुंदीकरणात बाधीतांचे पुनर्वसन अथवा नुकसान भरपाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असल्याने या बाबत पालिका कोणती भूमिका घेईल हे जाणून घेणासाठी प्रत्यक्ष रंदीकराणाच्या कामाला सुरूवात होईपर्यंत थांबावे लागणार आहे.