Home राजकारण महाविकास आघाडी विषयी शरद पवार यांचा मोठा खुलासा

महाविकास आघाडी विषयी शरद पवार यांचा मोठा खुलासा

110

मुंबई: मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची काल भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर वंचित महाआघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र विदर्भाच्या दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सोबत राहू अथवा नाही, हे भविष्याबाबत काहीच सांगता येणार नाही, असे सूचक विधान पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत महात्मा फुले अग्रीक्लचर फोरमच्या वतीने अमरावतीत आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी पवार आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे, आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ.