सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मुंबई पुणे येथील कोकणी भूमिपुत्र यांचा साधारण पंचवीस लाख रुपयांचा स्वनिधी भागभांडवलाच्या स्वरूपात उभारण्याचा सदर कंपनीचा मानस आहे. राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीसाठीचा समूह तयार करून १०० एकर जमीन क्षेत्रांमध्ये तुतीची लागवड करण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रेशीम संचालनालयामार्फत विविध प्रकारची अनुदाने मिळवून देण्यात येतील. तसेच मनरेगा योजनेच्या मार्फत देखील लाभ मिळवून देण्यात येईल.
ह्या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून राजापूर तालुक्याचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील माजी सैनिक श्री वसुदेव घाग, श्री अमर खामकर, श्री दयानंद चौघुले, श्री विश्वनाथ वरेकर, श्री राजाराम पाटेकर, श्री सुधिर पालकर यांनी आधी स्वबळावर बांबू शेती व आता आपल्यासोबत ५० शेतकऱ्यांना एकत्र करून रेशीम शेतीचा प्रकल्प हाती घेतला आहे. ह्या पहिल्या टप्प्यानंतर रेशीम प्रक्रिया प्रकल्प पुढील दोन ते तीन वर्षात कार्यान्वित करता येईल. जेणेकरून सदर शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळू शकेल. यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व त्याद्वारे त्यांचा आर्थिक विकास होईल.
रेशीम शेतीच्या क्षेत्रातील तज्ञांच्या मते या प्रकल्पाद्वारे राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात एकरी प्रतिवर्ष तीन ते चार लाख रूपयाची वाढ अपेक्षित आहे. तरी आपल्याच कोकणवासीयांच्या ह्या प्रयत्नांना आपल्या कडून भाग भांडवलाचा रूपाने भक्कम असा आर्थिक पाठिंबा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. या माध्यमातून कोकणात सहकार चळवळीचे बीज रोवून कोकणाच्या एकूणच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगतीच्या नव्या नांदीची आपण सगळे कोकणवासीय एकत्र मिळून सुरुवात करू. असे आवाहन राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कार्यक्रम स्थळ: नुतन विद्या मंदीर, ओणी, राजापूर, रत्नागिरीसोमवार दिनांक २४ एप्रिल २०२३वेळ : सकाळी १० ते दुपारी १ वा.
प्रमुख मार्गदर्शक: श्री. रमेश हांदे – रेशीम शेती तज्ञ M.Sc.(Agri.), PG Dip. Sericulture. श्री. महेश सावंत – रेशीम शेती शेतकरी व तज्ञश्री. प्रसाद कांबळे Faculty, (Co-ordinator) स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रत्नागिरी BOI, RSETI.
अधिक माहीतीसाठी संपर्क: पुनाजी गुरव : 9323691616, मंदार नार्वेकर: 9619277446 ला, विश्वनाथ वरेकर : 9225235125, प्रकाश गांवकर : 8356049477