Home स्टोरी शिक्षक भारती तालुका शाखा मालवणचे आज १६ एप्रिल रोजी कट्टा येथे अधिवेशन..

शिक्षक भारती तालुका शाखा मालवणचे आज १६ एप्रिल रोजी कट्टा येथे अधिवेशन..

83

मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती तालुका शाखा मालवण च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मान्यवर सत्कार सोहळा व तालुका अधिवेशन ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा तालुका मालवण येथे रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे श्री राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय श्री आप्पासाहेब गुजर गटशिक्षणाधिकारी मालवण माननीय श्री संजय माने, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग संतोष पाताडे हे असणार असून प्रमुख पाहुणे माननीय दयानंद नाईक, किसन दुखंडे, आशा गुणीजन, महेश नाईक, जनार्दन पाटील, गोविंद जाधव, विजय जाधव, संजय वेतुरेकर, अरुण पवार,वैशाली गरकळ, रवींद्र देसाई, मंगेश खांबाळकर, रामचंद्र डोईफोडे, दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंदरीकर, सिद्धार्थ नेरुळकर, लहू पाटील, रामचंद्र सातवसे, प्राजक्ता कन्याळकर, लीना भंडलकर, नेहा गव्हाणकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती सेजल परब, श्रीमती शितल परुळेकर, श्री संतोष कोचरेकर, संतोष परब आणि शिक्षक भरती शाखा मालवण च्या वतीने केले आहे.