Home स्टोरी बांदा येथील शिवराम धोंडीराम चव्हाण (२४) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास...

बांदा येथील शिवराम धोंडीराम चव्हाण (२४) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

118

सिंधुदुर्ग: मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी बांदा येथील शिवराम धोंडीराम चव्हाण वय वर्ष २४ या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने बांदा शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याचा सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबतची फिर्याद मयत युवकाचा काका दत्ताराम शिवराम चव्हाण यांनी बांधा पोलिसात दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवराम याची आई व बहीण ही मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही कारणानिमित्त तेथून जवळच असलेल्या जुन्या घरी गेली होती. दुपारी 2.30 वाजण्याचा सुमारास ती घरी परातली असता दाराला आतून कडी असल्याचे निदर्शनास आले त्यांनी हाक मारता आतून काही प्रतिसाद मिळाला नाही याची माहिती काका दत्ताराम यांना दिली. त्यांनी खिडकीच्या पटीतून आत पाहिले असता शिवराम हा लाकडी वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. कुटुंबीयांनी तात्काळ दरवाजा तोडत शिवरामला ऊच्यासाठी बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोगले कर्मचारी विजय जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत. शिवराम यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.