Home क्राईम अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यशस्वी सापळा कारवाई

अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यशस्वी सापळा कारवाई

127

ठाणे: अँटी करप्शन ब्युरो, ठाणे च्या अधिकाऱ्यांनी वासुदेव बिसन पवार, वय ५७ वर्ष, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, ठाणे. (वर्ग २) यांच्यावर कारवाई केली आहे. थोडक्यात माहिती अशी की, १,४२,०००/-रु एवढी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार १,४२,०००/- लाच स्विकारतांना कारवाई करण्यात आली आहे.लाचेची मागणी दि.२९/०३/२०२३ रोजी केली होती. याबाबत ACB कडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दि. १०/०४/२०२३ रोजी १६:३० वा. लाच स्विकारली व त्यानंतर ACB कडून हि कारवाई झाली असल्याची माहिती मिळत आहे. तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त रु. १,४२,०००/- स्वतः करिता व इतर लोकसेवकांकरिता लाचेची मागणी करण्यात आली होती. सदरची १,४२,०००/- रुपये लाचेची रक्कम आज रोजी स्वतः स्विकारल्यानंतर नमुद आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे . पुढील कारवाई चालू आहे. सापळा पथक – प्रमोद जाधव, पोलीस उपअधीक्षक, सहा.पो.उप.निरी/ शिंदे, पोहवा/ पवार, पोहवा/ गोसावी, मपोहवा/ जोंधळे, पोशि/ भुजबळ,मार्गदर्शन अधिकारीमा.श्री. सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्रमा.श्री.अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्रठाणे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणेदुरध्वनी 022-20813598 टोल फ्रि क्रं. 1064