Home स्टोरी शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या...

शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना फटकारले!

87

सिंधुदुर्ग: अलाहाबाद उच्च न्यायालयाने विचारलेल्या ‘ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या ‘शिवलिंगा’च्या वयाचे सुरक्षित वैज्ञानिक मूल्यांकन करता येईल का ?, या प्रश्‍नावर उत्तर न दिल्याने न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक व्ही. विद्यावती यांना फटकारले.न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, हे प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, विशेषत: त्याविषयी देशात सर्वांचे लक्ष आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्याविषयीचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. कुठल्याही प्राधिकरणाला अपेक्षित अहवाल सादर करण्याच्या बहाण्याने विलंब करण्यास आम्ही अनुमती देणार नाही. त्यामुळे महासंचालकांना १७ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याची शेवटची संधी आहे.गेल्या वर्षी मे मासामध्ये ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळली होती. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.