Home स्टोरी कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून गरजू रुग्णांना आर्थिक मदत.

कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून गरजू रुग्णांना आर्थिक मदत.

61

सिंधुदुर्ग: कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून डॉक्टर जयंत परुळेकर यांच्या माध्यमातून गंभीर आजार असलेल्या दहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले. हा उपक्रम डॉक्टर जयवंत कोळेकर हे दर महिन्याला आर्थिक दृष्ट्या हतबल गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी राबवतात. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ही मदत दिली जाते. हा उपक्रम दर महिन्याला ते राबवत असतात. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. याप्रसंगी विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.