Home स्टोरी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेचे घवघवीत यश

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेचे घवघवीत यश

81

सावंतवाडी प्रतिनिधी: जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले.या शाळेतील परीक्षेस बसलेले 17 ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील 9 विद्यार्थ्यांस ब्राॅंझ मेडल प्राप्त झाले.100 गुणांच्या परीक्षेत कु.पार्थ सतिश राऊळ (1ली) याने 88 गुण, कु. हर्षदा चंद्रकांत राऊळ (1ली) 88 गुण , दुर्गेश सावळाराम राऊळ (1ली) 85 गुण,श्री निलेश राऊळ (1ली) 84 गुण, पियुष अमित कोचरेकर (1ली) 83 गुण . या सर्वांनी ब्राॅंझ मेडल पटकावले . तसेच चैतन्य संदेश राऊळ (2री) 86 गुण, भूमी जगन्नाथ राणे (2री) 86 गुण, विहान महेश परब (2री) 85 गुण, सार्थक सुनिल पेडणेकर (2री) 83 गुण या सर्वांनी ब्राॅंझ मेडल पटकावले.

पार्थ सतीश राऊळ
श्री निलेश राऊळ
दुर्गेश सावळाराम राऊळ
चैतन्य संदेश राहुळ
भूमी जगन्नाथ राऊळ
सार्थक सुनील पेडणेकर
विनायक महेश परब
हर्षदा चंद्रकांत राऊळ

या परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री. प्रसाद आबा दळवी व उपशिक्षिका श्रीम. अर्चना दिगंबर तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मळगाव गावचे सरपंच मा. श्रीम. स्नेहल जामदार व उपसरपंच मा. श्री. हनुमंत पेडणेकर , सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी मा. श्रीम. कल्पना बोडके,आजगाव प्रभाग विस्तार अधिकारी मा. श्रीम. दुर्वा साळगावकर, मळगाव केंद्रप्रमुख मा. श्री. शिवाजी गावीत, शा.व्य.समिती अध्यक्ष मा.श्री. जगन्नाथ राणे, शा.व्य.समिती उपाध्यक्ष मा. श्री. विश्वनाथ राऊळ, शा. व्य. समिती माजी अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र राऊळ, ग्रा.पं.सदस्या निकिता राऊळ,शिक्षणप्रेमी मा.श्री. गोविंद राऊळ व सर्व शा.व्य.समिती सदस्य व ग्रामस्थ मळगाव ब्राम्हणआळी यांनी अभिनंदन केले.