Home क्राईम छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी पोलिसांची विशेष माहिती

छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणी पोलिसांची विशेष माहिती

214

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तब्बल ४०० पेक्षा अधिक हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरु आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी सुरवातील दोन गटात शुल्लक कारणावरून वाद झाला आणि तो मिटला देखील होता. मात्र त्यानंतर एका गटाचे अंदाजे ५० लोकांचा जमाव पुन्हा त्या ठिकाणी आला. पण पोलिसांनी त्यांना देखील पांगवले होते आणि वाद मिटला होता. मात्र दीड तासाने अचानक मोठा जमाव त्या ठिकाणी आला आणि त्यांनी दगडफेक करत जाळपोळ केली. त्यामुळे पोलीस आयुक्ताने सांगितल्याप्रमाणे दीड तासाने आलेला जमाव आला कोठून? गल्लीबोळातून अचानक जमाव कसा येत होता? याचा तपास पोलीस करत आहेत. तर पोलिसांनी वाद मिटवल्यानंतर, याच वेळी काही समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेतला. किराडपुरा परिसरातून वाद घालणारे तरुणांचे गट निघून गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये जिन्सी परिसरात अफवा पसरवण्यात आल्या आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठा जमाव आला. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्या आणि तरुणांना चिथावणी देणाऱ्यांचा आता पोलीस शोध घेत आहे. ‘दिव्य मराठी’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत जमावाला उद्युक्त करणाऱ्यांची काही नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, यात ८ ते १२ जण असल्याची शंका आहे. विशेष म्हणजे यात प्रामुख्याने स्वत:ला धर्म अभ्यासक असल्याचे सांगणारा व्यक्ती आहे. मूळ बीड शहरातील रहिवासी असलेला हा व्यक्ती आठ वर्षांपूर्वी जिन्सी भागात राहण्यासाठी आला होता. तर किराडपुरा भागात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या रात्री त्याची भूमिका महत्त्वाची होती. तसेच त्याच दिवशी पहाटे त्याने शहर सोडून पलायन केले आहे.