Home स्टोरी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!अजित पवार

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!अजित पवार

59

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागांनाही मोठा फटका बसलाय. मात्र, अनेक ठिकाणी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होण्यास वेळ लागली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे पवार म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून कांद्याचा प्रश्न उचलला होता. आम्ही अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान देतील अशी अपेक्षा होती. पण राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान दिले आहे. याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली अजून, अनुदान वाढवून देण्याची मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले.