अमृता फडणवीस यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी दोघेही अटकेत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच अनिल जयसिंघानी पवारांच्या संपर्कात होते असा दावा पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी केला. मात्र या प्रकरणावर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बोलू नये अशा सूचना शरद पवार यांनी NCP च्या सर्व नेत्यांना दिल्या आहेत. फडणवीस यांना १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीने मोठा दावा केला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयाला दिली.
Home स्टोरी अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी प्रकरणावर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बोलू नये! शरद...