Home स्टोरी म्हसळा शहरांतील बाजारपेठेसह गल्ली बोळांतूनही होत आहेत व्यापारी दुकाने : सतत होणारी...

म्हसळा शहरांतील बाजारपेठेसह गल्ली बोळांतूनही होत आहेत व्यापारी दुकाने : सतत होणारी ट्रॅफिक जाम मुळे नागरिक होतांत हैराण.”

110

म्हसळ प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या संखेमुळे सातत्याने ट्रॅफीक जामची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत पोलीस प्रशासनाची व्यवस्था पूर्णपणे कोलमंडली होती असे शहर वासीयांचे म्हणणे आहे. काल शनीवार दिनांक २५ वीकएन्ड मुळे पर्यटक आणि रमजान सुरु झाल्यामुळे ग्राहकांची  बाजारांत रेलचेल ,  दिघी नाका ते पाभरे फाटा या अंतरात केवळ एक  होमगार्ड रस्त्यावर   ट्रॅफिक जाम काढण्याचे  काम करीत आसल्याची घटना आणि सातत्याने ट्रॅफिक जाम होत आसल्याचे चित्र होते..म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या संखेमुळे सातत्याने ट्रॅफीक जामची समस्या निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांत पोलीस प्रशासनाची व्यवस्था पूर्णपणे कोलमंडली आसल्याचे शहर वासीयांचे म्हणणे आहे. 

शहरातील पाभरे फाटा ते दिघी नाका हा सुमारे ६०० मीटरचा महत्वाचा टप्पा आहे. याच परिसरांत दोन ट्रॅफीक पोलीस कार्यरत असावे असे असताना केवळ एक होमगार्ड देऊन पोलीस प्रशासन ट्रॅफीक जॅम करते का? हा महत्वाचा प्रश्न सतत ऐरणीवर असतो. याच कारणानी आता शहरातील अंर्तगत रस्त्यांपैकी पोलीस स्टेशन – ब्राह्मण आळी- दातार आळी- साने मोहल्ला  तसेच काजी मोहल्ला – मोमीन पुरा- या अंर्तगत रस्त्यांवरही अनेक वेळा ट्रॅफीक जॅमची समस्या मान वर काढू लागल्याचे चित्र आहे.    पाभरे फाटा ते दिघी नाका ह्या शहरातील ट्रॅफीक जॅमच्या मुख्य टप्प्यात अरूंद रस्ता , दोनही बाजूने उंच इमारती, तालुक्यातील महत्वाची प्रशासकीय कार्यालये, नगरपंचायत कार्यालय, बँका अशी महत्वाची वर्दळ असणारी कार्यालये , मुख्य रस्त्यालगत दोनही बाजूने उभी असणाऱ्या रिक्षा, मोटर सायकल व अन्य वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात, जुन्या व नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती रस्त्यापर्यंत बांधलेल्या आसल्याने या पट्टयांत सातत्याने ट्रॅफिक जाम होत असते. यावेळी स्थानिक बाजार रहाटी साठी आलेले पादचारी, महीला वर्ग याना रस्त्यावरून चालणेही अडचणीचे होत असते. पोलीस प्रशासनाने पुढील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे नागरिकाना आहे अपेक्षित : १)आठवडयाचे ५ दिवस  असणारे ट्रॅफीक पोलीस बहुतांश शनीवार-रविवारी नसतात,या दिवशी म्हसळा पोलीसानी आपली कुमक वाढविणे गरजेचे आहे. पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी साधारण पणे शनीवार क्राईम मिटींग किंवा कार्यालयीन कामासाठी वरीष्ठ कार्यालयांत आणि रवीवार साप्ताहिक सुट्टी यामुळे कर्तव्यात नसतात .२ )नगर पंचायत, R.T.O व पोलीस प्रशासनाचे माध्यमांतूनशहरांत पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. ३)शहरांतील अंर्तगत रस्त्यांचा  निकष ठरवणे व त्या दृष्टीने वापर करणे.( उदा. दुचाकी- तीन चाकी )४)श्रीवर्धन -दिघी साठी म्हसळा शहराला असणारा पर्यायी रस्ता प्राधान्याने दुरुस्त अथवा नवीन करणे.५)नगरपंचायतीने व्यापारी संकुल किंवा मुख्य रस्त्यालगत इमारतीचे नव्याने बांधकाम करताना पार्कींग सुविधे बाबत सक्तीचे करणे आवश्यक आहेफोटो :१ ) म्हसळा शहरांतील मुख्य रस्त्यावर झालेली वाहतुक कोंडी.२) म्हसळा पोलीस स्टेशन समोरील वाहतुक कोंडी