Home राजकारण छप्पन इंचवाले डरपोक निघाले ! दत्तकुमार खंडागळे….संपादक वज्रधारी

छप्पन इंचवाले डरपोक निघाले ! दत्तकुमार खंडागळे….संपादक वज्रधारी

182

प्रधानममत्री नरेंद्र मोदींचा अवमान केला असा आरोप ठेवून कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांंना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षाची सजा ठोठावली आहे. तसेच त्यांची खासदारकीही रद्द केली आहे. या घटणेनं देशात खळबळ माजली आहे. केंद्रीय संस्था व न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाही पध्दतशीरपणे संपवण्याचे काम चालू आहे. राहूल गांधींची सजा आणि खासदारकी रद्द करण्याचा निर्णय याच कटाचा भाग आहे. छप्पन इंचाची छाती म्हणून छाती बडवणारे सत्ताधीश राहूल गांधींना भ्यायले आहेत. छप्पन इंचवाले डरपोक निघाले आहेत. छप्पन इंचवाले भित्रे व डरपोक आहेत हे यातून सिध्द झाले आहे. लोकसभेत राहूल गांधींनी अदानीबाबत जे प्रश्न प्रधानमंत्र्यांना विचारले होते त्या प्रश्नांची उत्तर प्रधानमंत्र्यांना देता आली नाहीत. राहूल गांधींनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे अपेक्षित असताना मोदींनी उत्तरे न देता राहूल गांधींचे खानदान काढले. संसदेत छाती ठोकून बोलणारे छप्पन इंचवाले बोगस व पळपुटे असल्याचे या निमित्ताने सिध्द झाले आहे. त्यांनी ज्याला पप्पू ठरवले त्याच पप्पूची यांना इतकी धास्ती वाटावी ? हे विशेष आहे. केवळ चोर म्हंटले म्हणून दोन वर्षाची सजा आणि खासदारकी रद्द केली आहे ? महिलेवर बलात्कार करणारे, गर्भवती महिलेची हत्या करणारे गुजरातमध्ये मोकाट सोडले. त्यांचे जाहिर सत्कार केले. फुलं टाकून त्यांचे स्वागत केले.ज्यांनी चो-या केल्या, देश लुटून नेला ते मोकाट आहेत. मोदींच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांचे काहीच वाकडे केले जात नाही पण त्यांना चोर म्हणणा-याची खासदारकी रद्द केली जात आहे. वा रे व्वा न्याय ! हा निकाल देणा-याची सुरत न्यायालयीन आहे पण त्याचा आत्मा हुकूमशहाच्या अधीन असल्याचा संशय आहे. त्यांनी ठरवून न्यायालयामार्फत राहूल गांधींचा आवाज बंद करण्याचा खटाटोप केला आहे. देशातल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने लोकशाहीच्या गळ्याभोवती फास आवळण चालू केलय. राहूल गांधीची सजा हा त्यातलाच एक भाग आहे. प्रधानमंत्र्याच्या अवमानाचा मुद्दा उचलत हे कांड त्यांनी केलय. पण स्वत: प्रधानमंत्र्यांनीच त्या पदाचा गरिमा ठेवला नाही त्याचे काय ? त्या पदाची मोदींनी कसलीच लायकी ठेवली नाही. इतक्या मोठ्या पदावर बसून कसेही लबाड बोलायचे, थापा ठोकून द्यायच्या. हा प्रकार त्या पदाचा सन्मान वाढवतो काय ? मोदी ज्या पध्दतीने वागतात ती पध्दत पाहता त्या पदावर त्यांनीच बलात्कार केलाय असे वाटते. राहूल गांधींनी जे बोललय त्यापेक्षा हजारपट नरेंद्र मोदींनी त्या पदाची अब्रू घालवली आहे. या अवमानाचा विचार करता नरेंद्र मोदींना जन्मठेप द्यावी लागेल त्याचे काय ? भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या दहा पंधरा वर्षात इतरांच्या अब्रूचे जेवढे धिॆडवडे काढले तेवढे इतिहासात कुणीच कुणाचे काढलेले नाहीत. मोदी महाशय प्रचारसभेत सोनिया गांधींच्यावर टिका करताना त्यांना ‘कॉंग्रेस की विधवा” म्हणत होते. एक मुख्यमंत्री व प्रधानमंत्री पदाचा दावेदार प्रतीपक्षाच्या नेत्याला असे बोलत असेल, इतक्या नीच पातळीवर जाऊन बोलत असेल तर त्याला कुठली सजा द्यावी ? भाजप आणि संघ परिवाराने सोनिया गांधीची बदनामी करताना मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदीसोबत सोनिया गांधी सेक्स करतानाचे बोगस व्हीडीओ तयार केले. या भामट्यांनी नीचपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या. इतकं होवूनही राहूल गांधींनी स्वत:ची मर्यादा कधीच सोडली नाही, स्वत:चे संस्कार कधी सोडले नाहीत. टिका करताना कधी सभ्यतेची पातळी सोडली नाही. कधी मोदींच्या सोडून दिलेल्या बायकोला किंवा आईला लक्ष्य केले नाही. त्यांना राजकारणात ओढले नाही. या उलट नरेंद्र मोदींनी अशी एकही संधी सोडली नाही. हा फरक दोन प्रवृत्तीतला आहे. राहूल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तींच्या संस्कारातला फरक फार मोलाचा आहे. हा फरक संस्कृती आणि विकृतीतला आहे. या देशातल्या विकृती आणि संस्कृतीतला हा पुरातन संघर्ष आहे. संघपरिवार आणि भाजपवाल्यांच्या नासक्या डोक्यात नेहमी हेच राहिलं आहे. इतिहास चाळला किंवा अभ्यासला तर इतरांच्या चारित्र्यावर हल्ला करणारे हेच भामटे आहेत. त्यांच्या विकृतीला हे देशाची संस्कृती म्हणून थोपवू पहात आहेत. महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडीत नेहरू, शाहू महाराज वगैरे लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे हेच बदमाश आहेत. याच हलकटांच्या डोक्यातून जेम्स लेन जन्माला आला. त्यानेच जिजाऊ मातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. हा प्रकार आजचा नाही. हे जन्मजात खोटारडे आणि लबाड आहेत. यांनी लबाडी, दगाबाजी करतच आपले प्रस्थ वाढवले आहे. लोकांना आप-आपसात लढवत, त्यांचे मुडदे पाडतच यांनी स्वत:चे साम्राज्य उभारले आहे. आज हे भामटे शक्तीमान आहेत. त्यांना सत्तेची प्रचंड ताकद आहे. त्यांच्या सोबत सत्तेची व भाडवलशहांची प्रचंड ताकद असल्याने ते शक्तीमान आहेत. त्यामुळेच त्यांच्या विरोधातला आवाज दुबळा होतो आहे. जे विरोध करतात, जे आवाज उठवतात त्यांचा पध्दतशीरपणे कार्यक्रम लावला जातोय. तो कधी लोकशाहीच्या मार्गाने लावला जातो तर कधी ठोकशाहीच्या मार्गाने लावला जातो. या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर देशाची वाट लागणे अटळ आहे.

दत्तकुमार खंडागळे….संपादक वज्रधारी

मोबाईल -9561551006